Maharashtra Mansoon 2024 नैऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे . याबद्दलची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉक्टर होसाळीकर यांनी दिली आहे.
Maharashtra Mansoon 2024 महाराष्ट्रात मान्सूनच आगमन 2024 :
राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे अखेर नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन महाराष्ट्रात झाले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याचे पुणे शाखेचे प्रमुख डॉक्टर होसाळीकर यांनी दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी सोलापूर आणि पुढे भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडी पासून इस्लामपूर पर्यंत पोहोचल्याची माहिती पावसाळी घर यांनी दिलेले आहे.
राज्यात अखेर नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झालेले असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे ही बातमी आहे. राज्यात पावसाचे आगमन केव्हा होणार याची सर्वांना काळजी लागून राहिली होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले. राज्यामध्ये माणसांसाठी पोषक हवामान तयार झालेले होते. तसेच राज्यात मान्सूनपूर्व पाऊस मागील तीन ते चार दिवसापासून पडत होता.
राज्यात जोरदार पावसाची शक्यता :
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे दक्षिण आणि उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आज आणि उद्या असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज राज्यातील दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर उद्या दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस केळ्यांच्या बागांना मोठा फटका :
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडलेला आहे. विदर्भसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूर या परीसरात रात्रभर पाऊस पडत होता.
संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकण वाडा ,कोलद , काटेल ,भागात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्याचे चित्र समोर आलेले आहे. तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी चिंतेत असलेले पाहायला मिळत आहे.