Fal Pik vima 2024 राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये नेहमीपेक्षा जास्त उष्णता असल्यामुळे बऱ्याच पिकांवर परिणाम झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे दुष्काळ निर्माण झालेला आहे त्याचबरोबर फळ पिकांवर ही याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो.
अशामध्ये केळी उत्पादक शेतकरी हैराण झालेले आहेत उष्णतेमुळे केळीचे उत्पादन कमी झालेले आहे त्याचबरोबर केळीमध्ये नुकसान झालेले आहे. या केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे असा दावा जळगाव जिल्ह्याचे खासदार यांनी केलेले आहे.
Fal Pik vima 2024 मागील 2 वर्ष नुकसानीचे :
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नुकसानी सामोरे जावे लागले आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी ढगाळ हवामान गारपीट त्याचबरोबर दुष्काळ पाण्याची कमतरता किडीचा प्रादुर्भाव अशा गोष्टींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामागील दोन वर्षांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान सहन करण्याची ताकद आता संपलेली आहे पण राज्य सरकार या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी त्याचबरोबर पिक विमा व इतर योजनांच्या मार्फत मदत करत आहे.
येत्या 12 तासात या राज्यामध्ये रेमल चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्रात काय परिणाम होणार?
जळगाव जिल्ह्यात मिळणार नुकसान भरपाई :
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे खरंतर जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची केळी पिकांवर उत्पादन ठरलेले आहे. जळगाव केळी पिकांना संपूर्ण देशभर मागणी आहे
या जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस 42 डिग्री पेक्षा जास्त तापमान वाढीची नोंद करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील 75 महसूल मंडळातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि शेतकरी संकटात सापडले आहे.
पिक विमा नुकसान भरपाई साठी : ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या